शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६


आमच्या जि प प्रा शा हाताळा शाळेतील विद्याथिनीने केलेली सुन्दर रचना
खर पाहिलं तर कल्पनेला अंत नसतो लहान लहान चिमुकले काय करतील याची कल्पना न केलेलीच बरी 
शाळेत गेलो तेव्हा दररोज प्रमाणे आज काहीतरी नवीन होणार असे वाटत होते दुपारच्या मध्यांतर झाले तेव्हा काही विद्यार्थी मला काहीतरी दाखवण्यासाठी , काहीतरी सांगण्यासाठी आतूर झाले होते पण सांगायला लाजत होते मग लक्ष्मण जवळ आला व मला म्हणाला सर हे पहा आम्ही काय शिकलो आहोत त्याने इतराना सुचवले लगेच भराभर संजीवनी सरस्वती प्रतिभा व इतर विद्यार्थ्यांनी चित्रे ( कलाकृती ) दाखविण्यास सुरुवात केली
 
अबब काय त्यांची अजोड कलाकृती.................. एखाद्या नामवंत कलाकाराला लाजवेल अशी होती ......... त्यांचा दाखविण्याचा उत्साह थक्क करणारा होता...... त्यांचा आनंद .......... अप्रतिम .......
साहित्य आणण्याचा ........... जुळवाजुळव करण्याची ......... मेहनत करण्याची ......... वेळ देण्याची .... कसलीच तक्रार नव्हती ................ कार्य करता करता आनंद देत व घेत या कलाकारांनी आम्हाला हि मेजवानी दिली होती
thanks बाल कालाकारानो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा