बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

                                     
आनंदाची बातमी 

महाराष्ट्र साहित्य शिक्षण संस्था द्वारा
शिक्षण सेवा प्रतिष्ठान राजुरा
यांचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २०१६ हा पुरस्कार मला जाहीर झालाय
काय कमाल आहे बुवा ईश्वराची ............. 
जगणे म्हणजे काय ???????? ..... आनंद देणे आणि घेणे ....... याव्यतिरिक्त काय असेल बर .......
लहान लहान मुलामध्ये शिक्षण रुपी आनंद देऊन मजा घेतो मी .........बाकी काहीही नाही .....या आनंदाला जोड नाही....... अन पर्याय देखील नाही
मी सतत बालके घडविण्याचा प्रयत्न करतोय तर ते देखील मला घडवतात !!!!!!!! ...... ही सफर न संपणारी आहे ....... जशी तुमची मैत्री ..... व प्रेम .........
धन्यवाद अर्थात " DW" ( हे देखील मित्रांनीच शिकवलंय बर का ? )
शिक्षण सेवा प्रतिष्ठान राजुरा व आप्नावारखे जिवलग मित्र
या पुरस्कारापेखा आपल्या सद्भावना व प्रेम अधिक आवडते मला ......
ते राहू द्या ..............
आपला
मुकुंद पवार हिंगोली

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६


आमच्या जि प प्रा शा हाताळा शाळेतील विद्याथिनीने केलेली सुन्दर रचना
खर पाहिलं तर कल्पनेला अंत नसतो लहान लहान चिमुकले काय करतील याची कल्पना न केलेलीच बरी 
शाळेत गेलो तेव्हा दररोज प्रमाणे आज काहीतरी नवीन होणार असे वाटत होते दुपारच्या मध्यांतर झाले तेव्हा काही विद्यार्थी मला काहीतरी दाखवण्यासाठी , काहीतरी सांगण्यासाठी आतूर झाले होते पण सांगायला लाजत होते मग लक्ष्मण जवळ आला व मला म्हणाला सर हे पहा आम्ही काय शिकलो आहोत त्याने इतराना सुचवले लगेच भराभर संजीवनी सरस्वती प्रतिभा व इतर विद्यार्थ्यांनी चित्रे ( कलाकृती ) दाखविण्यास सुरुवात केली
 
अबब काय त्यांची अजोड कलाकृती.................. एखाद्या नामवंत कलाकाराला लाजवेल अशी होती ......... त्यांचा दाखविण्याचा उत्साह थक्क करणारा होता...... त्यांचा आनंद .......... अप्रतिम .......
साहित्य आणण्याचा ........... जुळवाजुळव करण्याची ......... मेहनत करण्याची ......... वेळ देण्याची .... कसलीच तक्रार नव्हती ................ कार्य करता करता आनंद देत व घेत या कलाकारांनी आम्हाला हि मेजवानी दिली होती
thanks बाल कालाकारानो