शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

           सोमनाथ दा hats off to you 
आज जिल्हा परिषद हिंगोली व महाराष्ट्र राज्य प्रा शि संघ यांनी आयोजित केलेले कार्याप्रेरणा शिबीर उत्साहात संपन्न झाले 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती जयश्री आठवले प्राचार्या डायट हिंगोली यांनी हिंगोली जिल्ह्यातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची वाटचाल विषद केली तदनंतर श्री दिपक चवणे शिक्षणाधिकारी हिंगोली यांनी मार्गदर्शक उद्बोधक मार्गदर्शन केले श्री थोरात सर अध्यक्ष म.रा.प्रा.शि.संघ यांनी आपली शिक्षक संघटना हि नेहमी शिक्षण व शिक्षकांचे प्रश्नसोडविण्यासाठी कसे प्रयत्न करते हे उलगडून दिले 
या सर्व औपचारीक्ते नंतर ज्याची सर्वांनी ओढ लागली होती त्या श्री सोमनाथ वाळके सर यांचे अमूल्य मार्गदर्शन झाले त्यांच्या मार्गदर्शन मधील ठळक मुद्दे 
१.शिकणे म्हणजे न करता येणारी गोष्ट चांगल्या प्रकारे करता येणे
२.वर्तनवाद व ज्ञानराचानावाद यातील फरक समजावून दिला
३.प्रत्येक मुलाला समजून घेणे खूप आवश्यक
४.प्रत्येक मुलाला शिकण्यासाठी आपला विशिष्ट वेळ द्यायला हवा.
५.मुलांच्या प्रतिभेचा सन्मान करा ते तसे घडतात
६.मुलाना ज्ञाननिर्मिती साठी प्रेरणा देणे आवश्यक
७.त्यासाठी अनुभवांची मांडणी आपण शिक्षकांनी करावी
८.मुलाना प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सहाय्य करावे
९.मुलाना निर्णय घेण्याची जबाबदारी उचलू द्यावी
१०.मुलाना त्यांच्या मनाप्रमाणे आनंद घेऊ द्यावे .

वरील बाबी समजाऊन देण्यासाठी सोमनाथ दा ने अक्षरशः अनेक कथा प्रसंग काही त्यांच्या जीवनातील तर काही समोर पाहिलेले सांगितले 
सोमनाथ ने जेव्हा स्वतःची चित्रकला शिक्षकाची कथा सांगितली तेव्हा त्याच्या तसेच उपस्थिताच्या डोळ्यात अश्रू तरळून गेले 
त्याच्या ' चिंचाळा ते सिडने " हि सत्यकथा ऐकून एक अशिक्षित घरातील मुलाला सलाम केल्यावाचून करमत नाही अंगावर रोमांच उभे राहतातच 
त्याने त्याच्या शाळेवर केलेल्या उपक्रमांची माहिती देताना राहून राहून डोक्यात विचार येत होता कि एवढी उर्जा हा आणतो कोठून? ? 
मुलांसाठी तयार केलेला studio त्यासाठी घेतलेली मेहनत खरेच अद्वितीय 
ज्ञानरचनावाद हा साहित्यात नसून तो मेंदूत आहे हे वाक्याने डोळ्यात झणझणीत अंजनच घातले 
त्याचा संवाद संपूच नये असे वाटत असताना त्याने आवरते घेत ""मह्या गुरुजीची गाडी " हि कथा सांगून समारोप घेतला खर सांगू मित्रा त्यावेळी सर्व सभाग्रह डोळ्यात पाणी आणून ऐकतच राहिले
सोमनाथ Really hats off to you मित्रा 
मुकुंद पवार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा