General Provident Fund कसे उचलावे ?

                        GPF म्हणजे भविष्य निर्वाह निधी होय.  कर्मचारी वर्गाचा पगारातील महत्वाचा घटक म्हणजे GPF होय .एका आर्थिक  वर्षामध्ये जेवढी रक्कम भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा होते तेवढी रक्कम INCOME TAX मधून कलम ८० C मार्फत( कमाल १५००००/- पर्यंत)वजा केली जाते. या फायद्यामुळे बरेच कर्मचारी भ.नि.नि.मध्ये रक्कम कपात करतात.दुसरा फायदा असा की यामुळे कर्मचारी वर्गाची बचत होते आणि त्यांना भविष्यात तिचा फायदा होतो. या योजनेचा तिसरा फायदा असा की या रकमेला व्याजदर ही चांगला असतो.या वर्षी तो जवळपास ८.७० %असा आहे.
                     या योजनेचे बरेच फायदे असलेतरी भ.नि.नि.उचलणे हि अवघड गोष्ट आहे.भविष्य निर्वाह निधी उचलणे साठी महाराष्ट्र राज्य पंचायत राज अधिनियम १९९८ कलम १३(१),१६(अ),१६(ब)नुसार खालील कारणासाठी भ.नि.नि.उचलता येते.
१)भविष्य निर्वाह निधी परतावा अग्रिम : (कलम १३(१) )
    ज्यांची सेवा १० वर्ष पूर्ण झाली नाही असे कर्मचारी अशा प्रकारे खालील कारणासाठी जमा रकमेच्या ५०% किंवा मुल पगाराच्या ३ पट भ.नि.नि.उचलू शकतात.
अ) आजारपण -
ब)उच्च शिक्षण
क)विवाह 
२)भविष्य निर्वाह निधी नापरतावा अग्रिम :कलम १६(ब)
  ज्यांची सेवा १० वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा अधिक झाली असेल असे कर्मचारी खालील कारणासाठी जमा रकमेच्या ७५% रक्कम भ.नि.नि.तून उचलू शकतात.
अ)जागा खरेदी करण्यासाठी 
ब)घर बांधकाम करण्यासाठी 
क)कर्जाची उर्वरित रक्कम फेडण्यासाठी 
ड )घर पुनर्बांधणी करण्यासाठी 
इ )घराचे नवीनीकरण करण्यासाठी 
३)भविष्य निर्वाह निधी नापरतावा अग्रिम :कलम १६(अ)
  ज्यांची सेवा २० वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा अधिक झाली असेल असे कर्मचारी खालील कारणासाठी जमा रकमेच्या ७५% रक्कम भ.नि.नि.तून उचलू शकतात.
अ)उच्च शिक्षण घेण्यासाठी 
ब)विवाह करण्यासाठी (मुला-मुलींचे)
क)आजारपणासाठी 
***************************************************
भविष्य निर्वाह निधी उचलण्यासाठी सर्वप्रथम कर्मचारी याने भ.नि.नि.उचलण्यासाठी चा प्रस्ताव दाखल करावा लागतो.त्यामध्ये 
*मा.शिक्षणाधिकारी यांना गटशिक्षण अधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव*
१.अग्रिम प्रस्ताव फोर्म 
२.भ.नि.नि.चाचणी पत्रक
३.जन्मतारखेचे प्रमाणपत्र 
४.सेवेचे प्रमाणपत्र 
५.कारणाचे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र 
६.कुटुंबातील सदस्याचे प्रमाणपत्र 
७.भ.नि.नि.कपात पत्र
८.नापरतावा रक्कम उचलल्याचे / न उचलल्याचे प्रमाणपत्र
९.भ.नि.नि.खाते तपशील 
१०.विनियोग प्रमाणपत्र 
                            अशा प्रकारे प्रस्ताव तयार केल्यानंतर तो मु.अ.मार्फत पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांच्या कडून शिक्षणाधिकारी यांच्या कडे जातो  मा.शिक्षणाधिकारी सर्व गोष्टी तपासून भ.नि.नि.उचलण्यासाठी चा आदेश देतात.
                           असा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याचे bill मु.अ.मार्फत केले जावून त्यावर मा.गटशिक्षणाधिकारी व मा.गट विकास अधिकारी यांची स्वाक्षरी होऊन ते bill जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी या कार्यालयात जाते . तेथे सर्व तांत्रिक बाबी तपासल्या जाऊन ते जिल्हा कोषागार कार्यालयात मान्यतेसाठी जाते.
                          जिल्हा कोषागार कार्यालयाकडून ते मान्य होऊन आल्या नंतर तांत्रिक बाबी तपासून मा.गट विकास अधिकारी यांच्या कडे आदेश व रक्कम पंचायत समिती कडे वर्ग केली जाते . तेथून संबंधित मु.अ.ला संबंधित कर्मचारी याचा नावाचा धनादेश दिला जातो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा